Minor Irrigation Department
Organizational Structure
Scheme′s
पाझर तलाव/गांव तलाव
पाणी पाझरण्यासाठी उपयुक्त असलेल्या भूस्तरीय स्तरावर नाला पाहून मातीचा बंधारा बांधून त्यामध्ये पावसाळयात पाणी साठवण्यात येते.अशा प्रकारे साठवलेले पाणी पाझरुन तलावाच्या खालील भागातील विहिरीच्या पाण्याची पातळी वाढते.तसेच पाझर तलावाखालील भूजलाची पातळी वाढविण्यास या तलावाचा उपयोग होतो. या तलावापासून होणारे सिंचन हे अप्रत्यक्ष स्वरुपाचे सिंचन असते.तलावातील उपलब्ध पाण्याचा उपयोग मत्स्यव्यवसायासाठी ही करता येतो.
उस्मानाबाद पध्दतीचे बंधारे
नदी किंवा नाले यातून पावसाळयात वाहून जाणारे पाणी दगडी बांध व झडपाद्वारे (लोखंडी गेट) आडविले जाते.यास कोल्हापूर पध्दतीचे बंधारे असे म्हणतात. यात उपसा पध्दतीने शेतकरी पाणी देवू शकतो.ज्याठिकाणी को.प.बंधाऱ्याचे वरील बाजूस मोठे धरण/तलाव असतो त्यामधून वरचेवर पाणी सोडून को.प.बंधाऱ्यामध्ये पाणी आडवून सिंचन केले जाते.
सिमेंट नाला बांध
नदी किंवा नाले यातून पावसाळयात वाहून जाणारे पाणी दगडी बांधकाम अथवा संधनकात बांधकाम करुन पाणी आडविले जाते.यास सिंमेंट नाला बांध असे म्हणतात.यामधून उपसा पध्दतीने शेतकरी शेतील पाणी देवू शकतो. ज्याठिकाणी सिमेंट नाला बांधच्या वरील बाजूस मोठे धरण/तलाव असतो त्यामधून वरचेवर पाणी सोडून सिमेंट नाला बांध मध्ये पाणी आडवून सिंचन केले जाते.
विभागाकडील विविध लेखाशिर्षखालील माहिती (मार्च 2018 अखेर)
जिल्हा वार्षिक योजना
सन 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये मागील अपुर्ण कामासह 58 ल.पा.सामान्य कामे व 72 को.प.बंधारे या लेखाशिर्षाअंतर्गत या विभागाकडील एकूण 130 कामे हाती घेण्यात आली होती.त्यापैकी 50 पूर्ण झालेली असून 03 कामे रद्द करण्यात आली आहेत. आणि उर्वरीत 77 कामे प्रगती पथावर आहेत. तसेच या दोन्ही लेखाशिर्षाखाली रक्कम रुपये 558.37 एवढे अनुदान खर्च करण्यात आलेले आहे.
जिल्हा परिषद स्वसंपादीत निधी
या लेखाशिर्षा अंतर्गत विभागाअधिनिस्त असलेल्या आणि पूर्ण झालेल्या योजनांच्या देखरेख व दुरुस्तीसाठी एकूण 39 कामे हाती घेण्यात आली आणि 14 कामे पूर्ण झालेली असून 25 कामे प्रगतीत आहेत त्यावर रुपये 20.97 लक्ष खर्च झालेला आहे.
जलयुक्त शिवार अभियान
सन 2015-16 पासून जलयुक्त शिवार अभियान या योजने अंतर्गत 132 कामे हाती घेण्यात आली त्यापैकी सन 2015-16 मध्ये 119 कामे पूर्ण झाली व 9 कामे रद्द करण्यात आली असुन 4 कामे अपुर्ण आहेत. या कामावर एकूण रुपये 516.38 लक्ष इतका खर्च झालेला आहे आणि त्यापासुन 3461 स.घ.मी साठवण क्षमता पुनर्स्थापित झाली आहे.
सन 2016-17 पासून जलयुक्त शिवार अभियान या योजने अंतर्गत 345 कामे हाती घेण्यात आली त्यापैकी सन 2016-17 मध्ये 269 कामे पूर्ण झाली व 62 कामे रद्द करण्यात आली. असुन 14 कामे अपुर्ण आहेत. या कामावर एकूण रुपये 1654.70 लक्ष इतका खर्च झालेला आहे आणि त्यापासुन 7909 स.घ.मी साठवण क्षमता पुनर्स्थापित झाली आहे.
सन 2017-18 पासून जलयुक्त शिवार अभियान या योजने अंतर्गत 416 कामे हाती घेण्यात आली त्यापैकी सन 2017-18 मध्ये 29 कामे पूर्ण झाली व 137 कामे अपुर्ण असुन 250 कामे निवीदा स्तरावर आहेत.या कामावर एकूण रुपये 109.72 लक्ष इतका खर्च झालेला आहे.
Introduction
आपल्या देशामध्ये 70 टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे.परंतु सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तसेच जलसंधारणाच्या मोठया प्रकल्पांचा शेतकऱ्यांना फार उशिरा लाभ होत असल्याने सध्या लघु पाटबंधारे कामांना फार महत्व प्राप्त झाले आहे.लघु पाटबंधारे स्वरुपाची 0 ते 100 हेक्टर्स मधील कामे अल्प कालावधीत पूर्ण होत असलेने त्याचा लाभ त्वरीत शेतकऱ्यांना होत असतो.यामध्ये समान्यपणे पाझर तलाव,गाव तलाव,को.प.बंधारे,साठवण तलाव अशी कामे केली जातात.
अशा 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेमधील लघु पाटबंधारेची कामे जिल्हा परिषद मार्फत विविध लेखाशिषांतर्गत राबविली जातात.यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषद कडील लघु पाटबंधारे विभाग असून त्याअंतर्गत 8 तालुक्यातील लघु पाटबंधाऱ्याची कामे लघु पाटबंधारे उपविभाग उस्मानाबाद,तुळजापूर,उमरगा,कळंब व परंडा उपविभागामार्फत केली जातात.
Video And Photo
२० - जुलै - २०१८
जिल्हा वार्षीक योजने अंतर्गत 0 ते 250 हेक्टर सिंचन क्षमतेच्या लघु पाटबंधारे योजनांच्या बांधकाम व दुरूस्ती मार्गदर्शन सुचना
२० - जुलै - २०१८
जिल्हा वार्षीक योजने अंतर्गत 0 ते 250 हेक्टर सिंचन क्षमतेच्या कोल्हापुर पध्दतीच्या बंधाऱ्यांचे योजनांच्या बांधकाम व दुरूस्ती मार्गदर्शन सुचना